Saturday, March 30, 2013

भूक लागली … खूप पर्याय आहेत

भूक लागली … खूप पर्याय आहेत

त्या दिवशी Maharashtra Times मधला लेख वाचला "कल्याणची खाऊगल्ली". त्यात खिडकी वडा, निलेश पाणीपुरी, पारनाक्यावरची पावभाजी अश्या बऱ्याच ठिकाणांची माहिती आहे. त्यात आणखी गोष्टींची भर घालावी म्हणून हा लेख -

कल्याण स्टेशन वरून शिवाजी चौकाकडे जाताना मध्ये हॉटेल लागत  "इच्छादेवी ". होटल लहानच आहे. पण प्रसिध्द आहे ते कांदाभजी साठी.

अहिल्याबाई चौकात पाणीपुरीच्या २ गाड्या लागतात. त्यावर संध्याकाळी खूप गर्दी असते. सुभाष मैदानं समोर संध्याकाळी वडापाव, भजी ची गाडी लगते. गाडीभोवती एवढी गर्दी असते की कधीकधी गाडी पण नाही दिसत. गाडीच नाव पण बरोबर शोभत तिला " फ़ेमस वडापाव".

सकाळी नाश्ता करायचा तो ही  मित्रांबरोबर तर मिसळ पाव शिवाय पर्याय नाही. टिळक चौकात सुरभी म्हणून छोट हॉटेल आहे. तिथे मिसळ पाव, वडा  पाव, पोहे वगैरे पदार्थ मिळतात. पण मजा येते ती मिसळ खायला. पुणेरी तिखट मिसळ. ही मिसळ प्रसिद्ध आहे ती जन्याची मिसळ म्हणून. तिखट मागितली की धूर निघालाच म्हणून समजा …. गांधी चौकात हरी विठ्ठला ची मिसळ पण तशीच प्रसिद्ध आहे. ह्या दोघां व्यतिरिक्त आणखी एक मिसळ प्रसिद्ध आहे  ती म्हणजे लोकमान्य हॉटेल मधली.

पारनाक्या जवळ अखिलेश पाणीपुरी वाल्याकडे नेहमी गर्दी मिळेल. त्याच्याकडे पाणीपुरी खायची आणि नंतर समोर कावरे आईस क्रीम खायचं. व्वा … समोसा खावा तर ठक्कर चा. टिळक चौकात ठक्कर फरसाण वाल्याच दुकान आहे. त्याच्याकडे फक्त सकाळीच सामोसा मिळतो. पहिल्या फटक्यात तुमचा नंबर लागला तर नशिब. नाहीतर वाट बघण आलच. त्याच्याकडची चटणी तर अप्रतिम.

संध्याकाळी लाल चौकीला जाताना तेलवणे हॉस्पिटल जवळ एका गाडीवर खूप गर्दी दिसते आणि येणाऱ्या  सुगंधामुळे राहवत नाही. ती गाडी म्हणजे पवार मुगभजी. एकदा खाऊन बघा बाकी सगळ विसराल. त्याशिवाय रामबागेत गेलात तर अंबर चा वडापाव पण प्रसिद्ध. त्याच्या वड्याला खरी चव येते ती त्याच्याकडच्या  चटणीमुळे.

बघा आणखी काय आठवत का आणि सांगा तुमच्याकडे काय काय प्रसिद्ध आहे ते ….


Thursday, February 21, 2013

देव दिवाळी !!!

देव दिवाळी !!!

 देव दिवाळी साठी गावाला जायचं ठरलं. म्हणून  सकाळची मांडवी पकडली  आणि संगमेश्वर ला पोहोचलो. त्या दिवशी घरीच राहायच होत. संध्याकाळी देवाची पूजा केली आणि  फटके फोडले.

दुसऱ्या दिवशीचा प्लान मात्र आधीच ठरला होता. सकाळी लवकर निघायचं आणि गणपतीपुळ्याला आणि मार्लेश्वर ला जायचं. तसं  लवकर निघायचं होत पण कसलं जमतंय. निघे  पर्यंत १० वाजले. दिवसभर गाडी घेतली होती भाड्याने. फक्त गाडीच कारण उदय काकाच गाडी चालवणार होते. घरच्याच झाडाची जास्वंदाची फुले घेतली होती. वाटेत जाम भूक लागली होती म्हणून काकांनी एका हॉटेल मध्ये नेले. हॉटेल सन राइस .... मस्त मिसळ पाव हाणला आणि पुढे निघालो.

अंतर फक्त २ तासाचच होत. पण मधेच गाडी बंद पडली ती पण चढणावर ..... मग काय सगळ्यांचीच कसरत. काका गाडी सुरु करण्याचा प्रयत्न करत होते, मी आणि भावेश तिला धक्का मारण्याचा !!!  प्रयत्नच होता तो कारण जसे काका क्लच सोडायचे गाडी मागे जायची. मग आम्हीपण तिच्या बरोबर मागे मागे ....  मी गाडीवाल्यावर थोडी शाब्दिक  फुले उधळली (पण मनातच) ... पण काकांनी शेवटी सुरु केली गाडी एकदाची. आणि निघालो पुढच्या प्रवासाला.

गणपतीपुळ्याला पोहोचे पर्यंत १ वाजून गेला होता. देवाचे दर्शन मस्त झाले. जेवायची वेळ झाली होती म्हणून हॉटेल मधे जाणार होतो तर काका म्हणाले  इथे गुरुजींकडे अप्रतिम जेवण मिळत. काकांच्या ओळखीचे एक गुरुजी होते. त्या बापट गुरुजींकडे जेवलो.  सुंदर..... खरच अप्रतिम जेवण होत. आमटी भात, पोळी , भाजी . मोदक आणि त्यावर तुपाची धार. व्वा !!!. काय मोदक होते ते !!!

पुढचा टप्पा होता मार्लेश्वर .... पण संगमेश्वर ला  थोडी खरेदी पण करायची होती. म्हणून प्लान चेंज  केला आणि संगमेश्वर ला आधी गेलो.  संगमेश्वरचा  फरसाण खूप मस्त मिळतो.  तो घेतला.  मुंबई ला पण आणायचा होता तसं दादाने सांगितलं  होत कारण गेल्यावेळी आणला होता तो त्याला खूप आवडला होता.

आणि मग निघालो मार्लेश्वरला .... वाटेत सोळजाई च दर्शन घेतलं. मार्लेश्वर ला जाई  पर्यंत संध्याकाळचे  ६ वाजले. काळोख पण झाला होता. मार्लेश्वाराचे देऊळ डोंगरावर आहे. तस ते देऊळ नाही. एका गुहेत शंकराची पिंडी  आहे. चढायला निघालो तो पर्यंत तर वाटेतली दुकाने पण बंद झाली होती. जवळ जवळ ६०० पायऱ्या आहेत. आम्ही वर जाणारे शेवटचेच होतो. मार्लेश्वराचे दर्शन घेतले. असा म्हणतात की कधीतरी त्या गुहेत नाग पण दिसतो. आम्हाला नाही दिसला.

आमच दर्शन झाल आणि पुजाऱ्याने देऊळ बंद केल. तिथल्याच एका माणसा बरोबर खाली येत होतो. त्याला विचारले, "पायऱ्यांवर स्ट्रीट लाईट आहेत पण मग चालू का नाहीत."  त्याने माहिती दिली की ते माकडांनी फोडले आहेत. आम्ही त्याला बोललो "आम्हाला तर नाही दिसली माकडं." भक्ती आणि प्रियांका थोड्या घाबरल्या माकडं म्हटल्यावर . मग तो म्हणाला "रात्री माकडं नाही येत कारण त्यांना वाघाची भीती असते,"  हे असं कारण सांगतात का कोणी. आम्ही घाबरल्याचे दाखवत नव्हतो पण थोडे घाबरलोच होतो.

तिथून थेट घरी गेलो. आणखी दोन दिवस गावालाच आराम केला आणि नंतर पुन्हा मुंबईच्या प्रवासाला सुरुवात केली.

Saturday, July 28, 2012

हैदराबाद भेट ( बंगलोर - हैदराबाद Return - by कार )

हैदराबाद भेट ( बंगलोर - हैदराबाद Return - by कार )

बरेच दिवस झाले ही पोस्त टाकीन म्हणत होतो पण काही जमत नव्हत. आज वेळ मिळाला.

बंगलोर वरून हैदराबादला ऑफिस मधील मित्राच्या लग्नाला जायचं होत. आधी ठरलं कि कार भाड्याने घेऊन जाऊ. विचारपूस केली तर ११ रुपये K . M . सांगितलं. सुरुवातीच्या माहिती प्रमाणे येऊन जाऊन साधारण  १२०० K . M . होणार होते. म्हणजे १३२००/-, आम्ही ५ जण (मी, अरुण, विशाल, अभ्रा आणि निरंजन) ,  म्हणजे प्रत्येकी २६००/- . तेही फक्त कार चे ? विचार बदलला. म्हटलं बस ने जाऊ. पण सगळे राजे. बस ने कोण जाणार. कार नेच जायचं. मग काय मित्राची कार काढली.

ऑफिस ला फक्त एकच दिवस सुट्टी टाकू शकत होतो. मग रात्रीच ड्राईव कारण आल. लग्न बुधवारच होत. मंगळवारी संध्याकाळी निघायचं ठरलं. बुधवारी लग्न आणि संध्याकाळी निघून रात्री उशिरा किंव्हा गुरुवारी पाहते परत यायचं. म्हणजे ऑफिस ला गुरुवारी जाता येईल. मग काय मस्त प्लान झाला. दोन option होते कार मध्ये. Accent किंव्हा मारुती Wagon r . मित्राला सांगितले जी गाडी जास्त average देते ती आन. मग काय Wagon r .

त्यात कार चालवता येणारे २ नच ( अरुण आणि  विशाल ). आळीपाळीने कार चालवायचे ठरलं. आणि निघालो एकदाचे ऑफिस नंतर संध्याकाळी ४ वाजता.  रस्ता मस्त होता. average स्पीड ९०+ . म्हटलं ६०० K . M . जायला जवळजवळ ७ तास आणि जेवायला आणि थोडा आराम करून म्हटलं तर ९ तास. म्हणजे रात्री १ पर्यंत पोहोचू सहज.
पण पुढे काहीतरी वेगळच वाढून ठेवलं होत. हैदराबादला पोहोचल्यावर मित्राला फोने केला तर तो बोलतो हैदराबाद वरून पुढे २०० K . M . आहे. पहिला झटका बसला. रात्रीचा १ वाजला होता. तसा अंदाज बरोबर होता किती पर्यंत पोहोचू त्याचा.  पुढे कस यायचं ते विचारलं. पण पुढे गेल्यावर मित्राने सांगितल्या होत्या त्या खुणा मात्र मिळत नव्हत्या. मग आम्ही समजलो कि आम्ही रस्ता चूकलो होतो. मित्राकडे mobile मध्ये GPS होत. ते सुरु केल. पण त्याला पण network  मिळत नव्हत. तो पर्यंत रात्रीच ३ वाजले होते. आता रात्री कोण सांगणार रस्ता. रस्त्याला कुत्र पण नव्हत अस काही म्हणता नाही येत कारण तुम्हाला माहिती आहे. बऱ्याच वेळाने एक  माणूस भेटला. त्याने सांगितलं कस जायचं ते.

कार मध्ये जे मागे बसले होते त्यांच्या पैकी मधे बसेल त्याची अवस्था जरा वाईट च होत होती. सीट अखंड नव्हती. ती joint होती. म्हणजे बराच वेळ बसलं कि मधे बसलेल्याची  सीट सुन्न ..... ;)

एकदाचे सकाळी ५.३० ला पोहोचलो. ज्याच लग्न होत तो मित्र आम्हाला घ्यायला आला होता. रहायची सोय हॉटेल मध्ये केली होती. जाऊन झोपलो पण तेही फक्त २ तास. ८ वाजता उठलो पटकन तयारी केली आणि लग्नाला गेलो. मित्राबरोबर stage वर फोटो काढून घेतला प्रूफ म्हणून कि आम्ही खरच गेलो होतो लग्नाला.

लग्नावरून दुपारी १ वाजता निघालो. हॉटेल मधून check out केल. आणि निघालो परत हैदराबाद ला. संध्याकाळी ५ ला पोहोचलो. प्रत्येकाला काहीना काही खरेदी करायचं होत. मी Pearls चा हार घेतला.  एवढा प्रवास केला होता. त्यात झोप नाही झाली. म्हटलं जाऊदे ... एक दिवस आणखी ऑफिस मध्ये नाही गेल तर काय बिघडणार आहे. म्हणून हैदराबाद मधेच राहायचं ठरलं. हॉटेल ची चौकशी केली तर सगळी हॉटेल महाग. मग ठरलं कि hyadrabadi  बिरीयानी खाऊ आणि पुढे कर्नुल ला जाऊन राहू. निरंजन बोलला कि हॉटेल Paradise ची बिरीयानी famous  आहे. त्याला माहिती होत कस जायचं ते. निघालो. आता येईल आता येईल करता १ तास नुसते फिरत होतो. पोटात कावळे ओरडत होते आणि आम्ही निरंजनला. एकदाच हॉटेल मिळाल आणि बिरीयानीवर ताव मारला. वा...झक्कास !!! होती बिरीयानी.

पोट भरल्यावर निघालो कर्नुल च्या दिशेने. झोप सगळ्याना येत होती. मी अणि अरुण पुढे बसलो होतो. आमच्या पुढे दोन वोल्वो बस ची race लागली होती. काय चालवत होते ते बस ड्राईवर. आम्ही पण टेंशन मधे. झोप येऊ नये म्हणून फुल volumn मधे गाणी लावली होती आणि मोठ्याने म्हणत पण होतो. एकदाचे रात्री 2 वाजता कर्नूल ला पोहोचलो. होटेल शोधले अणि झोपलो. 


सकाळी आरामात आवरून  निघालो bangalore च्या दिशेने. वाटेत लेपाक्षी म्हणून एक ठिकाण आहे. तिथे शंकराचे सुंदर मंदिर आहे. मंदिरा समोर एक 15 फूट उंच नंदी पण आहे.

लेपाक्षी मंदिर  




नंदी - लेपाक्षी मंदिर
 

वाटेत एक इस्कोन temple पण लागले. ते बहेरुनच बघावे लागले, कारण आम्ही पोहोचलो तेव्हा ते बंद होत.


इस्कोन  मंदिर 


येउन जाउन टोल लाच 1000 रुपये खर्च झाला.  पण मजा आली. आता एवढ्या मित्रांपैकी आम्ही 5 जणच गेलो होतो लग्नाला आणि खर्च पण खूप झाला होता मग काय गिफ्ट मधे आन्ही contribute नाही केल. इतर मित्र सहमत नव्हते आमच्या ह्या वागण्यात पण आम्ही म्हणालो की लग्नाला जाण महत्वाच होत. शेवटी नाहीच दिल आम्ही contribution.

एकंदरीत काय पिकनिक मस्त झाली.

Tuesday, February 1, 2011

बनेरघत्ता नेशनल पार्क ...

बनेरघत्ता नेशनल पार्क ...

मित्रांना मैसूरचे फोटो दाखवले. सर्वाना आवडले. एकाने सांगीतले जवळच बनेरघत्ता नेशनल पार्क पण आहे. जावून ये. म्हटल ठीक आहे जाऊ बघायला.आणि शनिवारी निघालो.
बंगलोर मजेस्टिक बस स्टॉप वर बसेस मिळतात. स्टॉप वर चौकशी केली तर हातवारे करून चौकशी काउंटर वरील माणसाने सांगितले. त्यावरून नाही समजले कुठे जायचे ते. मग काय एका conductor ला विचारले तर त्याने बस क्रमांक पण सांगितला. मग म्हटले तो चौकशी काउंटर वरील माणूस का बसला होता तिथे ? सरकारी कारभार दुसर काय ....
जायला वोल्वो बस आहेत. बसने साधारण एक ते दीड तास लागतो. टिकिट काउंटर वर लिस्ट वाचली. सफारी, Zoo , elephant ride , butterfly park . म्हटल आलो आहोत तर सर्व करू. म्हणून calculation केल आणि टिकेट काउंटर वर सांगीतल की काय काय करायच आहे. तर काउंटर वरील माणुस बोलला "elephant ride नहीं है". झाल ....  पुढे काय वाढून ठेवल आहे त्याची कल्पना आली.
एका मिनीबस मधून सफारी साठी घेउन गेले. बसमधे चांगली जागाशोधावी लागली कारण फोटो काढायचे होते. जागा मिळाली आणि सफारी सुरुवात झाली. बस ड्राईवर पण भारीच होता. बस अशी थाम्बवायाचा की त्याला निट दिसेल. बाकी सर्व लोकांच्या खिडकीसमोर झाड़ येत होती. सुरुवात होते शाकाहारी प्राण्यापासून. जुरासिक पार्क ची आठवण झाली ना.... पण शाकाहारी म्हणजे हरिण.....



साहेब pose देऊन उभे होते.
नंतर वाघ, सिंह, अस्वल. पण सगळ्यांचे फोटो नाही काढता आले. ड्राईवर साहेबांची कृपा दुसर काय.



सफारी ला मजा नाही आली. सफारीनंतर butterfly पार्क पहिले. तिथेही तीच अवस्था. मोजुन तीन - चार प्रकारची फुलपाखरे होती.





एका ठिकाणी उंचीवर कोळ्याचे जाळ दिसल. त्याचा पूर्ण zoom करून फोटो काढला.



आपल्या घरात दिसणारा कोळीही दिसला. टक लावून बघत होता बहुतेक. मला एकच टेंशन होत की कैमरा च्या लेंस वर उडी मारेल की काय.


फुलांचे फोटो मात्र छान आले.







आपण बराच काही विचार करून जातो की नेशनल पार्क म्हणजे...सफारी .... ZOO पेक्षा वेगळ अनुभवायला मिळेल. पण इथे तस काही नाही. ही एक प्रकारची ZOO च आहे. फ़क्त पिंजरे मोठे आहेत. एवढे की त्यातून बस जाऊ शकेल. एकंदरीत काय पूर्ण  Disappointing अनुभव होता. फोटो पहिले की तस नाही वाटत. पण अपेक्षापुर्ती नाही होत. 

Monday, January 17, 2011

Digicam पुराण .....

Digicam पुराण .....
मैसूरला जायच तर कैमरा हवा. अस मी आधीच्या पोस्ट मधे लिहिल आहे. म्हटल जरा तो अनुभव पण सांगू ....

कोणता कैमरा घ्यायचा ? हा गहन प्रश्न होता. खूप पर्याय होते. सोनी, निकोन, Canon . इतर पण होते . पण हे तीनच shortlist केले होते. शोधाला सुरुवात केली. कोणता घ्यायचा? काय configuration हवे ? किती पर्यंत पडेल? पहिले budget  ठरवल ८०००/- . पण नाही मिळाला हवा तसा. मग थोड थोड करत तब्बल १५०००/- पर्यंत वाढवल. पण मुख्य प्रश्न होताच " घ्यायचा कोणता?" मित्रांना विचारल . काहीजण बोलले सोनी तर काही निकोन.

हे सगळ चालू असतांना माझ्या ऑफिस मधल्या मित्रांना मात्र टेंशन आल होत की हा खरच घेणार आहे ना कैमरा? त्यांनी तर इतर ठिकाणी चौकशी पण सुरु केली होती कैमरा मिळेल का याची. कारण त्यांच ठाम मत झाल होत की मी काही मैसूर ला जाण्याआधी कैमरा घेत नाही म्हणून. असाच कसा घेणार ? १५०००/- चा प्रश्न होता. मग ठरवले आणि घेतला Sony  DSC H - ५५ . तेव्हा मित्रांना जरा हायस वाटल. फोटो पाहिल्यावर तर मला पण खूप बर वाटल. म्हटल योग्य निर्णय घेतला.

Wednesday, January 12, 2011

मैसूर भटकंती ...

मैसूर भटकंती ...
बंगलोर ला आल्यापासून बरेच दिवस चालू होते मैसूर ला जाऊ. पण जमतच नव्हते. एक दिवस ठरवल आणि गेलो. दिवस ४ डिसेम्बर २०१०.
फिरायला जायच तर DIGICAM हवा. मलाही घ्यायचाच होता, बरेच दिवस चालू होते. बजेट ठरवल ८०००/-. पण हवा तसा नव्हता मिळत त्या बजेटमधे. मग काय वाढवल बजेट आणि घेतला १४७००/- ला SONY DSC H-५५.
सकाळी ६.३० ला निघालो. ३ ते ४ तास लागतात बंगलोरपासून.  नाश्ता करायला थांबलो. एक जण उपमा खात होता. वाटल चला दोन महिन्यानंतर उपमा खायला मिळेल. पण समजल तो उपमा नव्हता lemon rice होता. सकाळी ८ वाजता कोण भात खाणार? म्हणून इडली खावुन पोट भरल.

सुरुवात केली देवदर्शनाने. श्रीरंगापत्तम ला  रंगनाथस्वामी  मंदिर पाहीले. इथे विष्णुची झोपलेल्या स्थितितिल मूर्ति आहे.





नंतर टीपू सुलतानचा महाल पाहिला. तिथून पुढे मैसूर प्राणीसंग्रहालय (ZOO) :)
मैसुरे ला जाताना एक बोर्ड वाचला  - TO OOTY . वाटले चला OOTY ला पण जाऊ. पण भावनांवर ताबा ठेवला. म्हटले नंतर जाऊ कधीतरी.
मैसूर ZOO मधील प्राणी खरच चांगल्या स्थितीत आहेत.



साहेब मस्त झोपले होते


काय बघताय राव... बहुतेक विचार करत असावेत - कोण प्राणी आले आहेत हे ? :)




साहेबांना बाहेर यायचे होते बहुतेक...


प्लास्टिकच्या होत्या बहुतेक....स्तब्ध पडून होत्या...

मैसूर प्राणीसंग्रहालय (ZOO) पाहून स्वारी निघाली मैसूर palace पहायला. काय म्हणावे त्याबद्दल .... अप्रतिम..... Palace मधे फोटो काढून नाही देत पण आवारात काढता येतात.




मैसूर Palace नंतर पुढचा स्टॉप चामुंडी मंदिर. मंदिर डोंगरावर आहे.


 दर्शन घेतले आणि पुढे निघालो. मैसुरच्या चर्चला धावती भेट दिली.


शेवटचा स्टॉप होता "वृन्दावन गार्डन". आपण सर्वानी movies मधे पाहिले आहे. तीच अपेक्षा घेउन गेलो पण ... ती मजा नाही आता तिथे. अपेक्षाभंग झाला.




वृन्दावन गार्डेन बघून परत प्रवास सुरु केला बंगलोर कड़े. एका ठिकाणी ढाब्यावर chicken tanduri वर ताव मारला. आणि मैसूर च्या आठवनी मनात आणि camera मधे साठवून परत आलो.

Sunday, April 4, 2010

पुन्हा एक बेत - होटेल मांडवी

पुन्हा एक बेत - होटेल मांडवी

बुधवारी दुपारी नॉन-वेज खायचा बेत आदल्या दिवशीच ठरला होता. त्याप्रमाणे आम्ही सगळे निघालो. मसजिद स्टेशन जवळ कर्नाक बंदराजवळ आहे होटेल मांडवी. एकदम लहान होटेल आहे. उत्कृष्ट नॉन-वेज मिळत. सर्व प्रकारचे मासे - बोम्बिल, सुरमय, कोलंबि, शिम्पले - काय मागाल ते.
आम्ही ६ जणांनी मिळून ४ सुरमय फ्राय, २ मांदेली फ्राय, १ बोम्बिल फ्रायवर हल्ला केला. बरोबर पोळ्या, भात आणि माशाचा रस्सा. जेऊन झाल्यावर सोलकढी. वा ! झक्कास बेत झाला.

बघा फोटो बघुनच कसं तोंडाला पाणी सुटतं ते . . .

सुरमय फ्राय


बोम्बिल फ्राय


मांदेली फ्राय



आणि

सोलकढी